मित्रांनो आज आपण डार्क मॅटर म्हणजे कृष्ण द्रव्य किंवा कृष्ण पदार्थ या विषयाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तुम्हाला कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल तर माहिती असेलच. परंतु कृष्णविवर आणि कृष्णद्रव्य हे खूप वेगळे आहेत. कारण कृष्णविवर हे आपण जरी पाहू शकत नसलो तरी शोषल्या जाणाऱ्या प्रकाशावरून आपण एखाद्या ठिकाणी कृष्णविवर आहे असा अंदाज लावू शकतो. परंतु कृष्ण द्रव्य हे त्याच्या व्याख्येनुसारच प्रकाशाबरोबर किंवा इतर कुठल्याही किरणांबरोबर बरोबर इंटरॅक्ट होत नाही म्हणजे कुठल्याही किरणांमुळे कृष्ण द्रव्याचा मागोवा घेता येत नाही.
खरं सांगायचं तर आत्तापर्यंत शास्त्रज्ञांना कृष्णद्रव्य कधीच पाहायला मिळालेलं नाही किंवा त्यांना शोधता आलेलं नाही. परंतु विश्वात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्यांना असं वाटतं की या विश्वात कृष्ण द्रव्य मोठ्या प्रमाणात आहे (विश्वाच्या एकूण वस्तुमानाच्या 85 टक्के )
यामागे बरीच कारणं आहेत त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दिर्घिकांची रचना आणि त्यातील तार्यांचा वेग. केपलरच्या नियमानुसार आपण जसे दीर्घिकेच्या केंद्रापासून किंवा आपल्या आकाशगंगेच्या केंद्रापासून दूर जातो तशी तार्यांची केंद्राभोवतीची गती ही कमी होत गेली पाहिजे. हाच नियम आपल्या सूर्यमालेला लागू होतो. सूर्यमालेजवळ असलेले बुध, शुक्र हे ग्रह सूर्यापासून दूर असलेल्या नेपच्यून, युरेनस इ. ग्रहांपेक्षा खूप अधिक वेगाने फिरतात. परंतु आकाशगंगेतील तारे त्यांचं अंतर आकाशगंगेच्या केंद्रापासून वाढत गेलं तरी एक समान वेगाने भ्रमण करतात आणि या घटनेमागील शास्त्रीय कारण आजघडीला शास्त्रज्ञांकडे नाही. त्यामुळेच त्यांना कृष्ण द्रव्य असावं असं वाटतं. परंतु काही शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की केपलरचे नियम दिर्घिकांसाठी लागू करता कामा नयेत त्यासाठी वेगळे नियम, सिद्धांत पहावे लागतील.
याबाबत खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे. आपण हळूहळू या विषयाबद्दल अधिक नक्कीच जाणून घेऊ.
More Stories
प्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल ! एलियन असण्याची कितपत शक्यता !!
मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81
गेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास ! नवं संशोधन !!