विज्ञानाचा वाटसरूच्या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी तसेच मराठी माणसाला विज्ञानाची गोडी लागून अधिकाधिक मुलांनी विज्ञानाचा अभ्यास करून संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करावे ही इच्छा ठेवून हा उपक्रम सुरु करायचा आहे. या उपक्रमांतर्गत आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करणार आहोत. त्यापैकी हे संकेतस्थळ म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट.
विज्ञानाच्या वाटसरूची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
१. अधिकाधिक विज्ञानविषयक माहिती मराठीत उपलब्ध करणे.
२. विज्ञानाविषयी मराठी समाजात गोडी निर्माण करणे.
३.विज्ञानक्षेत्रातील संधींची माहिती उपलब्ध करणे