जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

सादर आहे ताशी ५०० किमी वेगाने धावणारी मॅगलेव

जपानमधील उद्योजकांनी ५०० किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनचा प्रोटोटाईप निर्माण केलाय. ही ट्रेन मॅग्नेटिक लेविएशन या तंत्रज्ञानावर आधारित असेल. तसेच ही ट्रेन धावण्याकरता लागणारी वीज ही पूर्णतः वायरलेस तत्वावर पुरवली जाईल.

ही मॅगलेव्ह ट्रेन धावण्यासाठी लागणारी वीज ही इंडक्टिव्ह चार्जिंग च्या तत्त्वावर घेईल. इंडक्टीव्ह चार्जिंगचे तत्व हल्लीच्या काळात महागडे मोबाईल चार्जिंग करिता वापरले जाते.

जे आर टोकाय या कंपनीचा हा प्रकल्प असून ही कंपनी २०२७ पर्यंत ही ट्रेन टोक्यो ते नागोया या मार्गावर उभी करण्याचा विचार करत आहे. तयार झाल्यावर ही ट्रेन टोक्यो ते नागोया हे २३६ किलोमीटरचे अंतर केवळ ४० मिनिटांमध्ये पार करेल. भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान अमेरिकेला निर्यात करण्याचा जपानचा विचार आहे.

या गाडीचे शेवटचा आणि पहिला डबा (इंजिनाचे डबे) हिताची उत्पादित करणार असून निप्पॉन शोर्यो कंपनी मधल्या भागातील डब्यांचे उत्पादन करणार आहे.