जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

विषाणूंना खाद्य बनवणारे एक पेशीव सजीव ! नवं संशोधन !!

2020 हे वर्ष करोना विषाणूसाठी ओळखले जाईल, यात कुणाला शंका यायचे कारण नाही. पण आता एका अशा जीवाचा शोध लागला आहे, जो विषाणूंनाच त्याचे खाद्य बनवत असल्याची शास्त्रज्ञांना आढळलं आहे. अर्थात हे जीव नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या विषाणूंना खाद्य बनवू शकतात याबाबत माहिती अद्याप उपलब्ध व्हायची आहे.

सिंगल सेल जिनॉमिक सेंटर ॲट बिगेलो लॅबोरेटरी ऑफ ओशन सायन्सेसचे संचालक रामुनास स्टिपानुस्कास यांनी केलेल्या संशोधनानुसार प्रोटिस्ट प्रजातीच्या काही एकपेशीय जीवांमध्ये विविध प्रकारच्या विषाणूंचे डी एन ए आढळले आहे. परंतु या विषाणूंच्या पेशींमध्ये बॅक्टेरिया यांचे डीएनए मात्र आढळलेली नाही यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढलाय की हे प्रोटिस्ट प्रजातीचे एकपेशीय सजीव विषाणूंचा खाद्य म्हणून वापर करत आहेत.

या एक पेशीय सजीवांची नावे चोआनाझोअन्स आणि पिकोझोअन्स अशी असून यांना विषाणूपासून कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नसल्याने ते विषाणूंवर ताव मारू शकतात. अशा प्रकारचे विषाणूंना खाद्य म्हणून वापरणारे सजीव या पृथ्वीतलावर सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.