जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

भूगर्भशास्त्रज्ञांना सापडलं युरोपखाली गाडलं गेलेलं खंड : अँड्रीया

दक्षिण युरोपखाली जवळजवळ १० कोटी वर्षांपूर्वी गाडलं गेलेलं एक आख्खं खंड भूगर्भशास्त्रज्ञांना सापडलंय. पृथ्वीच्या पृष्ठभागावर या खंडाचे पुरावे शास्त्रज्ञांना चुनखडी आणि इतर प्रकारच्या खडकांच्या स्वरूपात सापडलेत.जवळपास २४ कोटी वर्षांपूर्वी हे खंड गोंडवाना या महाखंडापासून वेगळं झालं आणि उत्तरेकडे सरकू लागलं. १४ कोटी वर्षांपूर्वी या खंडाचा आकार ग्रीनलँडइतका होता. त्यानंतर १० ते १२ कोटी वर्षांपूर्वी ते युरोपला आदळलं. त्यावेळेस त्याचे तुकडे झाले आणि ते युरोपखाली गाडलं गेलं. शास्त्रज्ञांना या खंडावर संशोधन करायला तब्बल १० वर्षे लागली. सद्यस्थितीत पृथ्वीच्या प्रुष्ठभागावर या खंडाचे तुकडे तीस देशांमध्ये विखुरलेले असून हे खंड पृष्ठभागापासून सुमारे १५०० किमी खोलवर स्थित आहे.