जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

पृथ्वीबाहेरील ठिकाणांवर (चंद्र, लघुग्रह आणि परग्रह) खाणकाम करायला प्रोत्साहित करणाऱ्या पॉलिसीवर डोनाल्ड ट्रम्प यांची सही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच पृथ्वीबाहेरील ठिकाणांवर खाणकाम कारण्याबद्दलच्या अमेरिकन पॉलिसीवर सही केली . अमेरिकन सरकार फार पूर्वीपासून हि इच्छा ठेवून होते. यामुळेच अमेरिकेने १९७९ च्या मून ट्रीटीवर पण सही केलेली नाही. मून ट्रीटीनुसार अंतराळातील संपत्तीचा वैज्ञानिक उपयोग वगळता अन्य उपयोग करण्यासंबंधीचे निर्णय हे इंटरनॅशनल रेग्युलेटरी फ्रेमवर्कच्या माध्यमातून घेणे बंधनकारक आहे. याशिवाय २०१५ साली अमेरिकन काँग्रेसने अमेरिकन कंपन्यांना आणि नागरिकांना अंतराळातील संपत्तीचा वापर करणारा कायदा पास केला.
या नव्याने निर्माण केलेल्या पॉलिसीचा आर्टेमिस या अमेरिकेच्या मानवयुक्त अंतराळ कार्यक्रमाशी खूप जवळचा संबंध आहे. आर्टेमिस कार्यक्रमांतर्गत चंद्रावरती मानवाच्या दीर्घकालीन वास्तव्यासाठी स्थानक उभारण्याचा अमेरिकेचा मानस आहे. या कार्यक्रमांतर्गत अमेरिका २०२४ साली चंद्रावर यान पाठवेल. तर २०३० साली मंगळावर मानवयुक्त यान पाठवेल.
मात्र अमेरिकेच्या या निर्णयामुळे रशिया मात्र नाराज झाला आहे.रशियाच्या क्रेमलीन आणि रॉसकॉसमॉसच्या प्रवक्त्यानी हा अंतराळाच्या खाजगीकरणाचा प्रयत्न असून यामुळे आंतर्राष्ट्रीय अंतराळ संशोधनाला बाधा पोहोचेल असं मत व्यक्त केलंय.