आजुबाजूच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे या परिसरातील किरणोत्सर्गामध्ये वाढ झालेली आहे. चेर्नोबील ही अणुभट्टी 1986 स्फोटानंतर बंद पडली हे तुम्हाला माहिती असेलच.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या भागांमध्ये गेईगर काऊंटर नुसार किरणोत्सर्गाचे प्रमाण हे २.३ असून याची कमाल मर्यादा ही ०.१४ इतकी आहे.
चेर्नोबिलच्या स्फोटानंतर या प्रदेशातील सर्व लोकसंख्येला बाहेर हलवले गेले. त्यामुळे सध्या या भागात सर्वत्र रान माजले आहे. परंतु चेर्नोबिलच्या साठ मैल दक्षिणेला स्थित युक्रेनच्या राजधानीत, किवमध्ये किरणोत्सर्गामुळे काळजीचं वातावरण पसरलंय.
एका सत्तावीस वर्षाच्या तरूणाने मजा म्हणून पेटवलेल्या आगीमुळे हि समस्या निर्माण झाली. सध्या अग्निशमन दलाचे सैनिक आग विझवण्याचा प्रयत्न करत असून किवमधील लोकांना काहीच धोका नाही असं सांगण्यात आलंय. परंतु जर आग थांबवण्यात यश मिळालं नाही तर किरणोत्सर्ग अजून वाढेल का या प्रश्नाला युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नाही आहे.
More Stories
कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश ! नवा जागतिक उच्चांक !!
विषाणूंना खाद्य बनवणारे एक पेशीव सजीव ! नवं संशोधन !!
मेंदू मधील इम्प्लांटच्या सहाय्याने अंध व्यक्ती देखील पाहू शकल्या अक्षरे : ह्युस्टनमधील शास्त्रज्ञांचा प्रयोग