जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

गोठलेल्या बर्फाखाली महासागरांखाली जीवसृष्टी शोधण्यासाठी निर्मिलेला यंत्रमानव – ब्रुई

नासाने नुकताच ब्रुई नावाचा यंत्रमानव जगासमोर आणला आहे. हा यंत्रमानव विशेष करून परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी बनवण्यात आलेला असून हा यंत्रमानव एखाद्या रिमोट कंट्रोलच्या कारसारखा दिसतो त्याला दोन चाके असून त्यांना जोडणाऱ्या एक्सेलवर विविध उपकरणे जोडलेली आहेत. परंतु या यंत्रमानवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची चाके गोठलेल्या महासागरांवरील बर्फाच्या आवरणाखालील पृष्ठभागाला चिकटून प्रवास करू शकतात. ब्रुईच्या या वैशिष्ट्यामुळे हा यंत्रमानव समुद्रातील जीवसृष्टीचा आणि संबंधित संयुगांचा अधिक क्षमतेने शोध घेऊ शकतो.

ब्रुईची निर्मिती नासा आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या भागीदारीतून झालेली असून आर्क्टीक महासागर आणि अंटार्क्टिका प्रदेशात सध्या त्याची चाचणी सुरू आहे.

ब्रुईला गुरू ग्रहाच्या युरोपा या उपग्रहावर जीवसृष्टी शोधण्यास पाठविण्यात येईल. काही काळापूर्वी युरोपावर जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती.