जानेवारी 26, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

कोविड १९ च्या विषाणूचे ३० स्ट्रेन जगात धुमाकूळ माजवत आहेत. चीनमधील शास्त्रज्ञांचं मत

नव्या संशोधनानुसार SARS Cov 2 म्हणजेच कोविड १८ या रोगाचा विषाणू आतापर्यंत जवळजवळ ३० प्रकारांमध्ये (Genetic Strain) बदलला असून या विविध प्रकारांची /स्ट्रेनची घातकता कमी अधिक आहे. उदा. सर्वाधिक घातक स्ट्रेन हा सर्वात कमी घातक स्ट्रेनच्या तुलनेत २७० पट अधिक विषाणू निर्माण करतो (अर्थात मानवी शरीरामध्ये). हा या विषाणूचा प्रसार रोखण्यामध्ये असलेल्या अडथळ्यांपैकी एक महत्त्वाचा अडथळा आहे.
साथीच्या रोगांच्या संशोधनात नावाजलेले चीनमधील संशोधक ली लान्जुअन यांनी केलेल्या संशोधनामध्ये त्यांनी या विषाणुचे विविध स्ट्रेन प्रयोगशाळेत तपासले. या अभ्यासात त्यांनी हे विषाणू आश्रयदात्याच्या शरीराला कसा संसर्ग करतात आणि कशा प्रकारे मारतात हेही तपासले‌. लींच्या मते न्यूयॉर्क आणि युरोपमधील या रोगाच्या प्रसारामागे हा घातक स्ट्रेनच आहे. इतकेच नाही तर सीएटलमधील मृतांची आणि रोग्यांची संख्या कमी असण्यामागे तिथल्या विषाणूची कमी घातकता हे महत्त्वाचं कारण आहे. या विषाणूच्या अशा बदलत्या जनुकांमुळे या विषाणूवर लस आणि औषधे शोधणे जिकिरीचे काम ठरणार आहे