नमस्कार आज जग एका गोष्टीकडे डोळे लावून बसलंय, ती म्हणजे कोविड १९ ची लस. जगभरातील जवळजवळ पस्तीस कंपन्या आणि संस्था ही लस वाढण्यासाठी प्रयत्नामध्ये आहेत. त्यापैकी चार अशा कंपन्या आहेत ज्यांच्याकडे ज्यांनी औषध कुठलं द्यायचं हे ठरवलंय सुद्धा आणि ते सध्या प्राण्यांवर या औषधांची परीक्षा घेत आहेत. यापैकी एक कंपनी आहे मॉडर्ना जी लवकरच मानवी चाचण्यांची सुरुवात करेल. तर सीएटलच्या संस्थेने प्राण्यांवर चाचणी न करता मानवी चाचण्या घ्यायला सुरुवात केली सुद्धा !एवढ्या जलदगतीने तयारी होण्यामागचं कारण म्हणजे जगात पसरू शकणाऱ्या सर्व साथीच्या रोगांमध्ये करोना विषाणूने पसरणारे रोग हे सर्वाधिक धोकादायक समजले जातात. करोना विषाणूंनी अलीकडच्या काळात दोन मोठे साथीचे रोग पसरवले होते. ते म्हणजे सार्स आणि मर्स यापैकी या दोन्ही रोगांवरती चालू असलेले लस तयार करायचे काम, नंतर बंद करण्यात आले. कारण या दोन्ही रोगांची साथ इतर कारणांमुळे आटोक्यात आली. अमेरिकेतील नोवावॅक्स ही कंपनी या दोन रोगांवरील उपचारांसाठी तयार केलेल्या covid-19 या आजारासाठी पुन्हा वापरण्यायोग्य ठरतील का, हे तपासून पाहत आहे. तर मॉडर्ना मर्स या आजारासाठी तयार केलेल्या लसी covid-19 साठी वापरून पाहणार आहे.सार्स सी ओ व्ही -२ या विषाणूचा जनुकीय पदार्थ हा सार्स हा रोग पसरवणाऱ्या विषाणूशी ८० ते ९० टक्के इतका जुळतो. त्यामुळेच त्याच्या नावांमध्ये सार्स हा शब्द घेतलेला आहे. या दोन्ही विषाणूंमध्ये प्रथिनांच्या गोळ्याच्या आत आर एन ए असून या प्रथिनाच्या गोळ्याला काटे आहेत. तसेच हे दोन्ही विषाणू मानवी शरीरातील पेशींना एक सारखा रिसेप्टर (एसीई २) वापरून चिकटतात. पेशीची भिंत तोडून एकदा आतमध्ये गेल्यावर विषाणू पेशीची यंत्रणा वापरून हा विषाणू अनेक विषाणू तयार करतो आणि सरतेशेवटी बाहेर पडताना त्या पेशीला नष्ट करतो.बहुतेक लसी या एकाच तत्त्वावर काम करतात ते म्हणजे त्यांच्यामध्ये विषाणूचा काही अंश असतो. जो एका छोट्याश्या डोसच्या स्वरूपात दिला जातो जेणेकरून मानवी रोगप्रतिकारशक्ती त्या विषाणूसाठी अॅंटीबॉडीज तयार करते. नंतरच्या काळात या अॅंटीबॉडीज रोगप्रतिकारशक्तीच्या स्मरणात राहतात आणि पुन्हा कधी जर विषाणू शरीरात आला तर त्या तर या स्मरणशक्ती मुळे शरीर प्रचंड वेगाने अॅंटीबॉडीज तयार करून विषाणूंना नष्ट करते.हया लसी अंशतः कार्यक्षम आणि कमजोर अशा विषाणूपासून (पूर्ण अथवा अंशतः विषाणूपासून) बनवल्या जातात. या विषाणूंची कार्यक्षमता उष्णता देऊन अथवा रासायनिक प्रक्रिया करून कमी केलेली असते. परंतु अशा लसीचे काही धोके देखील आहेत. या लसीमुळे लस घेणारी व्यक्ती काहीवेळा आजारी पडू शकते. तर काही वेळा काही लोकांसाठी अशा लसी पुन्हा पुन्हा द्याव्या लागतात. काही कंपन्या मात्र नवीन पद्धत वापरत आहेत. ज्यामध्ये विषाणूच्या काट्यांची जनुकीय माहिती, बॅक्टेरिया किंवा यीस्टला जोडून लस तयार केली जात आहे. विषाणूच्या काट्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती सर्वप्रथम जागृत होत असल्याने, विषाणूच्या काट्यांशी संबंधित लस बनवणं या कंपनीला योग्य वाटतंय. तर इतर कंपन्या या विषाणूच्या आतील आर एन ए आणि जनुकीय पदार्थावर आधारित लसी बनवत आहेत.परंतु मानवी चाचण्या घेतल्या नंतर देखील लस बाजारात येण्यास खूप वेळ लागतो. यामागील कारण म्हणजे परवानगी दिल्या जाणाऱ्या लसी या वापरणे सुरक्षित आहेत का किंवा त्या विषाणू विरोधात करायला पूर्णपणे सक्षम आहेत का हे तपासून पाहिले जाते. यामुळे या लसी बाजारात यायला सन २०२१ उजाडणार आहे नक्की.
अणु ते अंतराळ