जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

कोविड १९ च्या रोग्यांवरती दुरूनच देखरेख ठेवण्यासाठी MIT ने बनवलंय नवं यंत्र

कोविड १९ चे रोगी तपासणे हे डॉक्टरांसाठी एक खूप धोकादायक काम आहे, हे काही वेगळं सांगायला नको. आणि हेच ओळखून एम आय टीच्या कॉम्पुटर सायन्स अँड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लॅबोरेटरी (CSAIL ) ने एक असे यंत्र तयार केलंय जे दुरूनच कोविड १९ च्या रोग्यांची श्वसन, त्यांच्या हालचाली आणि त्यांच्या झोपेचे निरीक्षण वायरलेस सिग्नलद्वारे करून कोविड १९ च्या रोग्यांची तपासणी करू शकते. या यंत्राला CSAIL ने एमराल्ड असं नाव दिलंय आणि हे यंत्र अमेरिकेतील बऱ्याच रुग्णालयांमध्ये वापर ले जात आहे .

एमराल्डचे दृश्य स्वरूप हे एखाद्या वाय फायच्या बॉक्स प्रमाणे असून त्याचा किरणोत्सर्ग हा मोबाईल फोनच्या किरणोत्सर्गाच्या तुलनेत १००० पटीने कमी आहे. एकदा हे यंत्र रोग्याच्या खोलीत लावले कि ते रोग्याची माहिती आपोआप डॉक्टरांना कॉम्प्युटरच्या पडद्यावरती देत राहते, जी डॉक्टर अगदी घरबसल्या देखील पाहू शकतात. अर्थात यामुळे डॉक्टर आणि परिचारिकांच्या रोग्यांशी खूप कमी संपर्क येतो आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

संसर्गाच्या व्यतिरिक्त या यंत्रामुळे वैद्यकीय व्यवस्थेवरील ताण कमी व्हायला देखील मदत होऊ शकते. कोविड-१९ या आजारामुळे अमेरिकेतील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता जाणवणे स्वाभाविक आहे आणि या यंत्रामुळे सौम्य संसर्ग असलेल्या रुग्णांची माहिती केवळ यंत्राद्वारे घेऊनवैद्यकीय कर्मचारी गंभीर रुग्णांकडे अधिक लक्ष देऊ शकतात. तसेच अगदीच गरज पडली तर सौम्य संसर्गीत रुग्णांना किंवा संशयित रुग्णांना घरीच अलगीकरण केले असताना यंत्राद्वारे त्यांच्या तब्बेतीवर लक्ष ठेवू शकतात.

एमराल्डचा इतर रोगांसाठी देखील केला जात आहे. डॉक्टरांच्या मते कोविड १९ डॉक्टरांनी रोग्यांच्या जवळ जाण्यातील धोका अधोरेखित झाला आहे आणि एमराल्ड सारखी यंत्रे ही भविष्यातील उपचारपद्धतीचा अविभाज्य भाग बनणार आहेत.