जानेवारी 27, 2023

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

कोविड १९ च्या चाचण्यांपासून उद्भवणारे फाँल्स निगेटिव्ह आणि त्यामागील कारणे आणि त्यापासून उद्भवणारे धोके

मंडळी, तुम्ही वृत्तपत्रांमध्ये कोविड १९ ची चाचणी दोन तीनदा निगेटिव्ह येऊन शेवटी पॉझिटिव्ह आल्याचं पाहिलं असेल. अगदी बीबीसी आणि चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काहीजणांना विषाणूची लागण झाली असली तरीही सहा वेळा अहवाल निगेटिव्ह आल्याचे म्हटले आहे. करोना विषाणूबद्दल चिनी सरकारला सर्वप्रथम धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉ. वेनलिंग यांना यामुळेच ओरडा खावा लागला. इतकंच नाही तर संसर्ग झालेल्या पेशंटचा उपचार करताना त्यांना खोकला आणि ताप आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि खूप वेळा चाचणीचा निकाल नकारात्मक आला. मात्र ३० जानेवारी रोजी डॉक्टरांच्या रक्तात विषाणू असल्याचे निदान झालेआणि दुर्दैवाने ७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.चुकीचे-निगेटिव्ह चाचणी परिणाम (टेस्ट रिझल्ट), फार समस्याजनक आहेत. कारण या परिस्थितीमध्ये रूग्ण इतरांना घरी, कामावर, शाळेत किंवा समाजात इतरांना संसर्गित करू शकतो. शिवाय उपचाराशिवाय रुग्णाची परिस्थिती देखील बिघडू शकते हे तर आलंच.कोविड १९ सारख्या अत्यंत संसर्गजन्य, संभाव्य प्राणघातक रोगाचा सामना करताना, अगदी थोड्याशा फॉल्स निगेटिव्हचा मोठ्या लोकसंख्येवर गंभीर आणि व्यापक परिणाम होऊ शकतो.या कोव्हीड -१९ आजारास कारणीभूत व्हायरसचे निदान करण्यासाठी डॉक्टर आरटी-पीसीआर नावाच्या चाचणीचा वापर करतात. आरटी-पीसीआर कोविड १९ च्या विषाणूची जनुकीय सामग्री शोधते आणि त्यावर आधारित निकाल देते. आरटी-पीसीआरचा उपयोग एचआयव्हीचा व्हायरल लोड मोजण्यासाठी केला गेला आहे, तसेच गोवर आणि गालगुंडासारखे इतर आरएनए व्हायरस तपसायला देखील हि चाचणी वापरली जाऊ शकते.तथापि, कोरोनाव्हायरससाठी आरटी-पीसीआर चाचण्या परिपूर्ण नेहमीच अचूक नसल्याचं आढळलंय. रेडिओलॉजी या आरोग्यविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या माहीतीनुसार चीनमधील हुनान प्रांतातील कोविड -१९ झालेल्या १६७ रुग्णांचे वैद्यकीय अहवाल तपासले गेले. पैकी ३%रूग्णांचे अहवाल सुरूवातीला निगेटिव्ह आल्याचं निदर्शनास आलं.जरी केवळ 3% चाचण्यांचे परिणाम फॉल्स निगेटिव्ह आले असले तरी यामुळे रोगप्रसार चालू राहून प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो. कोरोना विषाणूच्या चाचणी १००% बरोबर निकाल का देत नाहीत ?यामागे बरीच कारणे आहेत.जर संसर्गाच्या वेळी रुग्णाची तपासणी लवकर झाली आणि विषाणूची कमतरता आढळली, तर चाचणी चुकीचा निगेटिव्ह निकाल देऊ शकते. तसेच रूग्णाकडून घेतला गेलेला नमुना कमी असल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने घेतल्यास किंवा नमुना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने पण समस्या येऊ शकते.सदोष , खराब गुणवत्ता असलेली रसायने देखील चाचणीचा निकाल चुकीचा निगेटिव्ह करू शकतात. यामुळेच जगभरात आता गुणवत्ता नियंत्रण उपाययोजनांचा वापर करून या रसायनांची निर्मिती केली जात आहे. यावर काही तज्ञांनी फुफ्फुसांचा सीटी स्कॅन करणं हा एक मार्ग सुचवला आहे. पण मोठ्या प्रमाणात पसरलेल्या या रोगाची सीटी स्कॅनने चाचणी करणं कितपत शक्य आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यामुळेच बहुतेकवेळा संभाव्य रूग्णाची ठराविक काळाने पुन्हा पुन्हा चाचणी केली जात आहे.यामुळेच कोविड १९ च्या आजारावर सर्वोत्तम उपाय म्हणजे इतरांपासून अंतर राखणे आणि घराबाहेर न‌ पडणे. शासनाच्या नियमांचे पालन करूया. करोना विषाणूला हरवूया.२,१७०People Reached१९३प्रतिबद्धतापोस्टला उत्तेजन द्या

८२८२१९ शेअरआवडलेटिप्‍पणी

सामायिक करा