नोव्हेंबर 27, 2022

विज्ञानाचा वाटसरू

अणु ते अंतराळ

अमेरीकन स्पेस फोर्स चंद्रावरती उभारणार तळ

गेल्या आठवड्यात झालेल्या अमेरिकन वायुसेनेच्या परिषदेमध्ये अमेरिकन स्पेस फोर्स कमांडर जॉन शॉ यांनी चंद्रावरती सैन्याचा तळ उभारणार असल्याची घोषणा केली. अमेरिकन स्पेस फोर्सचा नासा बरोबर अंतराळात जाण्या संबंधी झालेल्या या करारानंतर काही दिवसांमध्येच ही नवी घोषणा स्पेस फोर्सने केली आहे.

मात्र अमेरिकन स्पेस फोर्सचा चंद्रावर मानवी सैनिक पाठवण्याचा मात्र अद्याप फारसा विचार नाही कारण अंतराळात आणि मानवासाठी चंद्रावर वास्तव्य करणे खूप अवघड आहे आणि याठिकाणी रोबोट उत्तम प्रकारे काम करु शकतात असे कमांडर जॉन शॉ यांना वाटते. याचबरोबर जगामध्ये सर्वत्र आणि विशेषतः अमेरिकेत रोबोटच्या तंत्रज्ञानामध्ये खूप वेगाने प्रगती होत आहे हेही यामागील एक महत्त्वाचे कारण आहे.

राष्ट्रीय अंतराळ सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वेगवेगळी स्वयंचलित यंत्रे तसेच उपग्रह येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला पृथ्वी, चंद्र तसेच सूर्याभोवती देखील प्रदक्षिणा घालताना दिसतील असेदेखील जॉन शॉ यांनी यावेळी सांगितले.