अमेरिकन अंतराळसेनेला नुकतंच त्यांचं नवं आणि पहिलं शस्त्र मिळालंय: एक असं यंत्र जे जमिनीवरून उपग्रहांच्या संदेशलहरी थांबवू शकतं. या तंत्रज्ञानाला काउंटर कम्युनिकेशन सिस्टिम असं म्हटलं जातं. हे तंत्रज्ञान तसं जुनंच आहे. परंतु हे यंत्र अमेरिकन सैन्याला नुकतीच दिलं गेलं आहे. आता या यंत्रांच्या सहाय्याने अमेरिकन सैन्य शत्रूंचे उपग्रह बंद जमिनीवरूनच बंद पडू शकते.
हि यंत्रे अमेरिकन सैन्याला नवी असली तरी त्याचा उपयोग जगामध्ये अन्यत्र आधीपासून चालू आहे. रशियन सैन्याने अशी शस्त्रे २०१९ पासूनच वापरायला सुरुवात केली आहे. हि शस्त्रे कशी काम करतात हे एक महत्वाचे गुपित असले तरी अशा प्रकारच्या किमान १३ प्रणाली जगात २०१७ पासून कार्यरत आहेत अशी माहिती आहे.
काउंटर कम्युनिकेशन सिस्टिम उपग्रहांना कुठलेही नुकसान पोचवत नसले तरीही त्यांच्यामुळे शत्रूच्या सैन्याला आणि एकूणच शत्रूराष्ट्राला मोठा धोका संभवतो. या प्रणालीमुळे सैनिकांना मोहिमेवर असताना त्यांना आवश्यक संदेश मिळू शकत नाहीत. या शस्त्रामुळे क्षेपणास्त्र सतर्कता प्रणाली बंद पडल्यास शत्रू राष्ट्राला होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती न मिळाल्याने शत्रूराष्ट्राचे मोठे नुकसान होऊ शकते.
More Stories
प्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल ! एलियन असण्याची कितपत शक्यता !!
मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81
कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश ! नवा जागतिक उच्चांक !!