पार्टिकल फिजिक्सनुसार या विश्वातील प्रत्येक पार्टीकलला म्हणजे कणाला अँटीपार्टिकल आहे असं मानलं जातं. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनचे अँटीपार्टिकल पॉझिट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनला ऋण विद्युतभार असतो, तर पॉझिट्रॉनला धन विद्युतभार असतो. तर काही पार्टिकलचे जसे की फोटॉनचे अँटीपार्टिकल हे फोटॉनच आहेत.

पार्टिकल आणि अँटीपार्टिकलबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एकमेकांवर आदळल्यावर नष्ट होतात आणि उर्जा म्हणजे फोटॉन उत्पन्न होतात. याच वेळेला विद्युतभार हा कायम राहतो.

पार्टिकल आणि अँटीपार्टिकलबद्दल या विश्वामध्ये समानता आहे, असं मानलं जातं. उदाहरणार्थ एक अॅंटीप्रोटॉन आणि एक पॉझिट्रॉन एकत्र येऊन एक अँटी हायड्रोजनचा अणु तयार होतो. या अॅंटी हायड्रोजनच्या अणुचे गुण हे हायड्रोजनच्या अणुच्या गुणाप्रमाणेच असतात. शास्त्रज्ञांनी आत्तापर्यंत ॲंटीहायड्रोजन आणि ॲंटीहेलियम यांचे अणु प्रयोगशाळेत निर्माण केले आहेत. त्यापेक्षा अधिक अनु क्रमांकाच्या मूलद्रव्यांचे अँटीपार्टिकल तयार करणे अद्याप जमलेले नाही. जरी पार्टिकल आणि अँटीपार्टिकल यांचा विद्युतभार वरील उदाहरणांमध्ये विरूद्ध असला तरी न्यूट्रल पार्टिकलचे अँटीपार्टिकल